भगवान श्री.जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व मिरवणूक मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावे;अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन
अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री.जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्यातील दि.२७ ऑगस्ट मंगळवार रोजी येत आहे.भिंगार शहरात हा सण मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने मोठ्या आनंद उत्साहाने व धार्मिक रीतीने साजरा करण्यात येतो.
या शोभायात्रेमध्ये नगर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक भाविक भक्त भगवान गोगादेव महाराज यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.सध्या आज राज्यात अनेक ठिकाणी दंगल व अनुचित प्रकार घडत आहे.या मुळे येणाऱ्या प्रत्येक सण व मिरवणूक मध्ये नागरिकांचे मनात भितीचे वातावरण पसरले आहे.
तरी राज्यातील वातावरणाचा पूर्णपणे गांभीर्याने विचार करुन भगवान गोगादेव महाराज यांच्या मिरवणूक मध्ये कोणतेही प्रकारचे गालबोट लागू नये.व शहरातील वातावरण ही देखील खराब होऊ नये अश्या गुंड प्रवृत्तीच्या समाज कंटाकावर करडी नजर ठेवण्यासाठी भिंगार शहरात येणारा उत्सव भगवान श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव शोभायात्रा मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बळ व मिरवणूक मार्गावर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे या बाबत अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे यांना अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा कार्याध्यक्ष शुभम टाक,जिल्हा सचिव दीपक नकवाल,जिल्हा सचिव संतोष सारसर,उपसचिव आकाश ठाकुर,म.न.पा.सफाई कामगार युनियनचे उपाध्यक्ष अजय सौदे,सामाजिक कार्यकर्ते तालेवार गोहेर,देविदास धुलिया,आकाश कुडीया,नरेश चोहान,विकास पंडित,दिलीप सुर्यवंशी,गोविंद घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.