Maharashtra247

कत्तलीसाठी घेवुन जाणाऱ्या १५ गोवंशीय जनावरांना कोतवाली पोलिसांकडून जीवदान

 

अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-कत्तलीसाठी घेवुन जानारे १५ गोवंशीय जिवंत जनावरे व एक पीकअप गाडी सह एकुण ५ लाख ५५,००० रुपये किंमतीचा मुददेमाल कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे.दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि/प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,

अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडीगेट येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरीता जनावरांना नेत असून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रितीने दोरीने दाटीरेटीमध्ये दोन पीकअप मध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावर घेवुन जात आहे अशी माहीती मिळाल्याने पोनी/दराडे यांनी याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे पथक बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडीगेट येथे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचे पिकअप क्रमांक एमएच ०८ एपी ०८३६ हे संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सदर दोन पिकअप वाहनास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव हकिम इब्राहिम शेख धंदा ड्रायव्हर रा.मुकुंदनगर,अरबाज खलील शेख रा.कोठला झेंडीगेट,तोफिक युनूस कुरेशी असे असल्याचे सांगीतले.

त्यांस त्याचे गाडी मधील काय माल असल्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये १,०५,०००/-रु किंमतीचे ३ मोठ्या गोवंशीय जर्सी गाय काळे पांढरे रंगाचे १२ लहान बछडे काळे पांढरे रंगाचे तसेच ४,५०,०००/-रु किंचे पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप असा एकुन ५,५५,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्यांच्या विरुद्ध विरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं /२०२४ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(ब), ९ प्रमाणे प्राणि क्लेश प्रतिबंध अधिनियम सह सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पोकाँ/सुरज कदम यांचे फिर्यादीवरुन् गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेकों/ बनकर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सो,पोहेकॉ/१२१२ ए.पी. इनामदार,पोना/संगीता बडे,दिपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम, सचिन लोळगे,सत्यजित शिंदे,सुजय हिवाळे,अनुप झाडबुके,राम हंडाळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page