Maharashtra247

गॅसटाकी लिकेज झाल्याने आग;नऊ जणांसह जनावरे होरपळली

 

राहता प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

यात तालुक्यातील एकरुखेत गॅसची टाकी लिकेज झाल्याने आग लागून नऊ जणांसह जनावरे होरपळली गेली आहे.येथील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गॅसची टाकी लावण्यासाठी टाकीचे सफेद झाकण उघडले असता त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली.

ही बाब वायकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गॅसची टाकी उचलली व घराच्या बाहेर आणून पाण्यात फेकली परंतु गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला व गॅस घराबाहेर असलेल्या चुली पर्यंत पोहचल्याने गॅसने पेट घेतला त्यामुळे आसपास असणारे नऊ जण व चार जनावरे होरपळल्याने दुर्दैवी घटना घडली आहे.

You cannot copy content of this page