Maharashtra247

नगर तालुका कबड्डी स्पर्धेत श्री.भैरवनाथ विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुलींनी पटकावला प्रथम क्रमांक 

 

अहमदनगर (दि.२४ ऑगस्ट):-नगर तालुका कबड्डी स्पर्धेत आगडगाव येथील श्री.भैरवनाथ विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकविण्यात यश आले आहे.या विद्यालयाने सलग तीन वर्षे विजयाची घोडदोड कायम ठेवली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.उद्धवराव दुसुंगे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.साळुंके त्रिंबक सर यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना श्री.रवींद्र हंबर्डे सर,श्री.झुंबर खर्षे सर,श्री.कैलास पालवे सर,श्री.सचिन मकासरे सर,श्रीम.कुंदा नवथर,श्रीम.दुसुंगे प्रज्ञा . श्रीम.भापकर प्राजक्ता,श्री.सचिन घोरपडे,श्री.ठोंबे अक्षय,श्रीम.वाबळे मंगल यांचे मार्गदर्शन मिळाले.

या प्रसंगी श्री काळ भैरवनाथ कबड्डी क्लब आगडगावचे सर्व खेळाडू यावेळी उपस्थित होते.त्याच बरोबर श्री. काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कर्मचारी,ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य वि.का.सेवा.सोसायटीचे चेअरमन व सर्व संचालक व ग्रामस्थ आगडगाव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page