अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जानेवारी):-पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी महिलेला मारहाण करीत तिच्याशी गैरवर्तन केले.या महिलेने दिलेले फिर्यादीवरून दोघांविरुद्ध मारहाण करणे आणि विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.केडगाव उपनगरातील भूषणनगर भागामध्ये एका महिलेने परिसरातील राहणारे आरोपी रामेश्वर डोईफोडे आणि मुकेशकुमार सिंग यांच्याबरोबर वाद झाले होते. या वादाची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचा राग धरून दोघांनी गुरुवारी (ता.१२) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घरी येऊन आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याज का दिली,असे म्हणून तसेच ढकलून दिले.तिला लज्जा उत्पन्न होईल,असे गैरवर्तन केले.या महिलेने दिलेले फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध मारहाण करणे आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.