पुर्ववैमनस्यातुन एकमेकांवर गावठी कट्टयातून गोळीबार ८ आरोपी ताब्यात
अहमदनगर (दि.२० सप्टेंबर):-जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये व्यवसायाचे वाद व पुर्ववैमनस्यातुन एकमेकांवर गावठी कट्टयामधुन केलेल्या गोळीबाराच्या गुन्हयातील एकूण ८ आरोपी ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव पोलिसांना यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.19 सप्टेंबर 2024 रोजी श्री.स्वामी समर्थ मंदिरासमोर, कोपरगाव ता.कोपरगाव, जि.अहमदनगर नाजीम इस्लाउद्दीन शेख याने तनवीर रंगरेज व त्याचे मित्र यांचे विरूध्द यापुर्वी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचे कारणावरून रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे याने नाजीम शेख याचेवर गावठी कट्टा रोखुन फायर केला.परंतु कट्टयामधुन कट्ट असा आवाज आला.त्यामुळे नाजीम इस्लाउद्दीन शेख याने त्याचे कडील कट्टयामधुन तनवीर रंगरेज याचेवर फायर केला.याबाबत नाजीम इस्लाउद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 422/2024 बीएनएस कलम 191 (3), 191 (2), 190, 189 (4), 189(2), 126 (2), 109 (1) सह आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वर नमूद ठिकाणी रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे हे त्यांचे मित्रासह कोपरगाव येथुन राहता येथे स्वीप्ट कारने जात असताना नाजीम इस्लाउद्दीन शेख व त्याचे साथीदार इनोव्हा कार आडवी लावून पुर्वी दाखल झालेल्या गुन्हयाचे कारणावरून,तसेच व्यवसायाचे वादातुन तन्वीर रंगरेज यास शिवीगाळ करून,वाहनाचा दरवाजा उघडून नाजीम इस्लाउद्दीन शेख याने कमरेचा गावठी कट्टा काढुन तन्वीर रंगरेज याचे छातीवर व कमरेवर कट्टाने फायर केला.याबाबत रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 423/2024 बीएनएस कलम 109 (1), 126 (2), 3 (5), 351 (3),352 सह आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.कोपरगाव शहरामध्ये व्यवसायाचे वाद व पुर्व वैमनस्यातुन परस्पराविरूध्द गावठी कट्टयातुन झालेल्या फायरिंगची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर व पोनि/श्री.भगवान मथुरे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन,गुन्हयातील आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हेमंत थोरात,पोसई/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार अतुल लोटके,गणेश भिंगारदे,बाळासाहेब पालवे,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,अमोल कोतकर,आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर,शिवाजी ढाकणे,अमृत आढाव,विशाल तनपुरे,प्रमोद जाधव,प्रशांत राठोड,अर्जुन बडे,महादेव भांड,अरूण मोरे व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सपोनि/किशोर पवार,पोसई/हंडोरे,पोलीस अंमलदार गणेश काकडे, दिपक रोकडे,गणेश मैड अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
वरील पथकाने तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडुन गुन्हयातील आरोपीची माहिती काढुन,आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना कोपरगाव व नाशिक शहरामधुन ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे, वय 31, रा.पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता. राहाता 2) अमर बाळु भोसले, वय 23, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता 3) बन्सी उर्फ रवि राजेंद्र बनसोडे, वय 24, रा.बाजारतळ, शिर्डी, ता.राहाता 4) बाळासाहेब शिवाजी पगारे, वय 25, रा.जाधव वस्ती, शिंगवे, ता.राहाता 5) नाजीम इस्लाउद्दीन शेख, वय 26,रा.गांधीनगर, कोपरगाव 6) अझर इस्लाउद्दीन शेख, वय 24, रा.गांधीनगर, कोपरगाव 7) एजाज अन्सार मणियार, वय 24, रा.गांधीनगर, कोपरगाव 8) मोदया उर्फ सागर रामदास मंजुळे, वय 23, रा.कोपरगाव असे सांगीतले.ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
ताब्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपीपैकी 1) रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे, याचेवर 13 गुन्हे 2) अमर बाळु भोसले याचेवर 8 गुन्हे, 3) बन्सी उर्फ रवि राजेंद्र बनसोडे याचेवर 7 गुन्हे 4) नाजीम इस्लाउद्दीन शेख याचेवर 5 असे गुन्हे यापुर्वी दाखल आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.