चिंचोली गुरवमध्ये संशयितरित्या फिरणारे ड्रोन सदृश्य वस्तूचा प्रशासनाने शोध घ्यावा ग्रामस्थांची मागणी
संगमनेर (तालुका प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरवमध्ये फिरणारे ते ड्रोन सदृश्य वस्तू चोरीच्या उद्देशाने फिरतायेत का? गावात एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
ड्रोन आकाशात तसेच नागरिकांच्या घरावर घिरट्या घालत असल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले असून प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.रात्री चार ते पाच ड्रोन परिसरात घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळी हे ड्रोन का फिरत असतील? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.त्यातच गावात चोरीच्याही घटना मोठ्या प्रमाणात घडल्याने याचा वापर चोरीसाठी तर नाही ना केलं जात? असाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलिसांकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त केली जात आहे.परंतु अजूनही या ड्रोन बाबतीत कसलाही सुगावा लागलेला नाही संशयितरित्या घिरट्या घालणाऱ्या या ड्रोनचां शोध लावून प्रशासनाने गावकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.