नगर शहरात महिलांसाठी आनंदोत्सव;आ.संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन लाखोंची बक्षिसे
अहमदनगर (दि.२९ सप्टेंबर/प्रतिनिधी):-आमदार संग्राम जगताप हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने शहरातील एक ते सतरा प्रभागासह भिंगार व बुरुडगाव येथे ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात रविवारपासून झाली असून लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्याने लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि भरघोस बक्षिसांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत.विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय उल्लेखनीय आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य, शैक्षणिक संधी आणि सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत.आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने प्रत्येक प्रभागात लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे.रविवार दि. 29 सप्टेंबर पासून प्रभाग एक व प्रभाग सात पासून लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झाली असून कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव असल्याने महिलांनी हिरीरीने भाग घेतला.
लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमात विजेत्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्या विजेत्या महिलेस सुझुकी ॲक्सेस आणि 11 हजार रुपयांची पैठणी, द्वितीयसाठी फ्रीज आणि पैठणी,तृतीयसाठी पैठणी व टीव्ही 32 इंच,सात उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी पैठणी व स्मार्ट वॉच बक्षिस देण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.नवरात्रोत्सवात फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आमदार संग्रामभैय्या सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी,कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
भाग्यवान विजेत्यांसाठी भव्य मोफत लकी ड्रॉ
आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने नगरमध्ये लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच महिलांसाठी भव्य आणि आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.पहिले बक्षिस सुझुकी ॲक्सेस व 11 हजारांची पैठणी ठेवण्यात आली आहे. तसेच विजेत्या महिलांसाठी मोफत लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. विजेत्या महिलांना फ्रिज, टीव्ही 32 इंच, वॉशिंग मशिन, स्मार्टफोट, कुलर, गॅस शेगडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्युम क्लीनर, आटा चक्की, मिक्सर ग्राइंडर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
लाडकी बहिण पाठोपाठ..लाडकी होम मिनिस्टर…
राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या संपर्क कार्यालय येथे मोफत अर्ज भरण्याची सोय केली होती.तसेच स्वतःही त्यांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरुन घेतले आहेत. तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात पदाधिकाऱ्यांचीही महिलांना मोठी मदत झाली.आ. जगताप यांच्यामुळे शहरातील बहुतांश लाडक्या बहिणींना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले आहेत. आता खास महिलांसाठी आ. संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने महिलांकडून आ. संग्राम जगताप यांचे विशेष आभार मानले जात आहे.