Maharashtra247

तक्रार देण्यास आला अन्.. हत्यारासह जेरबंद झाला तोफखाना पोलिसांची कामगिरी

 

अहमदनगर (दि.२९ प्रतिनिधी):-तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या इसमास पोलीसांनी चारचाकी वाहनासह घातक हत्यारासह ताब्यात घेतले आहे.हि घटना दि.२८ सप्टेंबर २०२४ रोज़ी तोफखाना पोलीस ठाण्यात घडली आहे.

बातमीची हकीकत अशी की,तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये एक इसम हा पोलीस स्टेशनमधे तक्रार देण्यास आला तेव्हा तोफखाना पोलीस स्टेशनचे पोनि/आनंद कोकरे यांना गोपनीय माहीती मिळाली की,सदर इसमाच्या कार नंबर एम एच १५ सी डी ०५९१ मध्ये तलवार व चाकु व इतर घातक शस्त्र आहेत,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई/शैलेश पाटील व तपास पथकाचे अंमलदार यांना कारवाई करण्यास सांगितले.

पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन पंचाचे समक्ष सदर इसमाचे गाडीची पंचाचे समक्ष झडती घेतली असता त्याच्या गाड़ीमध्ये एक धारदार लोखंडी तलावर ३४ इंच लांबीची,एक लोखंडी धारदार सूरा १४ सेमी लांबीचा तसेच एक कार ही जप्त करण्यात आली असून पोउपनिरी श्री.अमोल गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोस्टे येथे गुरनं १०५६/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणें गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोना/चांगदेव आंधळे हे करत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधोक्षक श्री.प्रशांत खेरे,उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती मार्गदर्शनाखाली पोनि.श्री.आनंद कोकरे, पोउपनिरी.श्री.शैलेश पाटील,पोउपनिरी अमोल गायधनी,सफो/ तनविर शेख,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट,दिनेश मोरे, विनोद गंगावणे,लोणारे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार,सुरज वाबळे,वसीम पठाण,सुमीत गवळी, शिरीष तरटे,सतीश त्रिभूवन,दत्तात्रय कोतकर,बाळासाहेव भापसे,सतीष भवर, राहुल म्हस्के,अनिल रोकडे,शफी शेख यांनी केली आहे.

You cannot copy content of this page