चिंचोली गुरव गावात मतदान जनजागृती मोहीम संपन्न;तलाठी शिरसाट यांनी नागरिकांना ईव्हीएम बॅलेट बाबत दिली माहिती
संगमनेर (तालुका प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी राज्याच्या दौऱ्यावर आले होते.
तलाठी चांगदेव शिरसाठ यांनी केले मार्गदर्शन
या दौऱ्यात पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली.त्यानंतर आज विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक तथा इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकी संबंधीची मते जाणून घेतली.त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या दौऱ्याचा तपशील सादर केला.
यावेळी राजीव कुमार म्हणाले,आम्ही दोन दिवस विविध राजकीय पक्षांसह सर्वच भागिदारांशी चर्चा केली. त्यात सर्वच सणवार लक्षात घेऊन मतदानाची तारीख ठरवणार असल्याचे ते म्हणाले.राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम,व्हीव्हीपॅट मशिन आणि निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण व्हावी,यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या वतीने आज संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावात याबाबत जनजागृती अभियानाचा प्रचार सुरू आहे.मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे.
सर्व मतदान केंद्रांवर आणि मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅन द्वारे हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.यावेळी चिंचोली गुरव गावचे तलाठी चांगदेव शिरसाट यांनी नागरिकांना ईव्हीएम बद्दल माहिती देऊन मतदान करताना कोणते बटन वापरायचे व कंट्रोल युनिट बॅलेट याची सविस्तर माहिती देऊन मतदानाबाबत नागरिकांन मध्ये जनजागृती केली.यावेळी मंडलाधिकारी डोंगरे मॅडम,ऋषिकेश सोनवणे,नानासाहेब आभाळे,बाबासाहेब माळी,मधुकर सोनवणे, बाळासाहेब बिडवे,व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.