रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत सत्ता परिवर्तन निर्धार मेळावा संपन्न
श्रीगोंदा प्रतिनिधी:-श्रीगोंदा तालुक्यातील बालाजी मंगल कार्यालय येथे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचां मोठ्या उत्साहात सत्ता परिवर्तन निर्धार मेळावा पार पडला.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे हे मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते तसेच या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस नेते श्री.घनःशाम आण्णा शेलार व माजी जि.प.सदस्य श्री.अनिल ठवाल,मुकुंद सोनटक्के, रावसाहेब हरिभाऊ पोडके,कांतीलाल कोकाटे,निशांत लोखंडे व पदाधिकारी तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (A) चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोषबापु गलांडे,महाराष्ट्र सचिव अशोकजी ससाणे,केंद्रीय कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे,महाराष्ट्र संघटक कैलासजी जोगदंड,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ खरात,जिल्हा संपर्क प्रमुख रोहित आव्हाड,युवा जिल्हा संपर्क प्रमुख विलास कांबळे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष उत्तर अमोन शिंदे तसेच प्रदीप मकासरे,रॉकी लोंढे, हरिष आल्हाट,दिनेश पंडित,जॉन पाटोळे, संदिप वाघमारे,दादा घोडके,परशुराम घोडके, भगवान गजरमल, युवराज शिंदे,युवराज शिंदे,राहुल छत्तीसे, करण चव्हाण,अजित भोसले,कमलाकर आल्हाट,अक्षय लगाडे, वैभव रणसिंग,विवेक घोडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी आपल्या भाषणात बोलतना सांगितले की येत्या काळात अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) हा पक्ष मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करत असून पुढील राजकीय घडामोडीत भरीव कामगिरी करणार असून नेहमीच संविधान वाचवणे तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात जाहीर भूमीका पेऊन गरीब,आदिवासी, दिनदुबळ्या, अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम पक्षामार्फत करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तसेच येत्या काळात अ.नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ गायकवाड यांच्या हातून पक्ष हिताचे व समाजहिताचे कार्य घडेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे श्री.घनशाम आण्णा शेलार यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, आजपर्यंतच्या राजकीय क्षेत्रात आंबेडकरी समुदायाचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि मेळाव्याच्या नावाप्रमाणेच नक्कीच येत्या काळात सत्ता परिवर्तनातही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व सर्वच आंबेडकरी विचारधारेतील समूहांचा मोठा वाटा असणार आहे हे नमूद केले.या मेळाव्याला मोलाची साथ दिलेले सचिनजी घोडके,नानासाहेब सांगळे,नितीनजी जावळे या मान्यवरांचा दिपकभाऊ निकाळजे यांच्या हातून सत्कार करण्यात आला.