मा.आमदाराला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक
अहिल्यानगर (दि.८ ऑक्टो):-अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (वय ८२) यांच्यावर सोमवारी दि.७ ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी काल मध्यरात्री पोलिसांनी भानुदास मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानकातून अटक केली.अटकेनंतर प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.