उन्नती महिला मंच कडून शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा;महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीरे कायमस्वरूपी राबवणार उपाध्यक्षा नेहा धाडवे/ढोके
छत्रपती संभाजी नगर/ (प्रतिनिधी):-अरविंद फाउंडेशनच्या अंतर्गत उन्नती महिला मंच कडून शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
नवरात्रनिमित्त फाउंडेशनच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी,मोफत स्त्री रोग तपासणी शिबिराचे उपक्रम सुरु आहेत.यावेळी उन्नती महिला मंच कडून महिलांना दररोजच्या व्यस्त कामातून थोडा विरंगुळा म्हणून विविध वेगवेगळे खेळ घेण्यात आले यात लिंबू चमचा,संगीत खुर्ची यासारखे खेळ घेण्यात आले व भरघोस बक्षीसही देण्यात आले.
यावेळी उन्नती महिला मंचच्या अध्यक्षा सुशीला शहाणे,उपाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या नेहा धाडवे/ढोके यांच्यासह परिसरातील महिला व उन्नती महिला मंचच्या सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.यावेळी नेहाताई धाडवे/ढोके म्हणाल्या की उन्नती फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीरे कायमस्वरूपी राबवणार असून या शिबिरांचा महिलांना भविष्यात आरोग्यासाठी नक्कीच फायदा होईल.