सेंट्रींग प्लेटांची चोरी करणारे दोन सराईत आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांकडून चोवीस तासाच्या आत जेरबंद
नगर प्रतिनिधी (दि.१ डिसेंबर):-सेंट्रींग प्लेट चोरी करणारे दोन आरोपी चोवीस तासाच्या आत भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे.यातील फिर्यादी श्री. किरण भारत विघ्ने रा.गोंधळे मळा,नागरदेवळे ता.जि. अहमदनगर यांचे मालकीच्या 31,000/रुकि.च्या सेंट्रीगचे प्लेट प्रियदर्शनी शाळेसमोर,वाल्मीक नगर,नगर पाथर्डी रोड येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत दि.31/11/2002 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटनेबाबत बाबत सपोनी/श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,दि.29 नोव्हेंबर रोजी ज्या इसमाने प्रियदर्शनी शाळेसमोरून सेंट्रीग प्लेटा चोरून नेल्या आहे त्या मधील 2 आरोपी हे सैनिकनगर, भिंगार गावात फिरत असलेबाबत माहीती मिळाल्याने सपोनी श्री/शिशिरकुमार देशमुख यांनी पोलीस पथकातील सफो/रमेश वराट,पोहेकॉ/बिभीषन दिवटे,पोना/भानूदास खेडकर,पोना/राहूल द्वारके,पोकॉ/अमोल आव्हाड,चापोकों/अरूण मोरे यांना रवाना केले. त्यानुसार सैनिक नगर भागात पेट्रोलींग करत असताना दोन इसम संशयीत रित्या फिरताना मिळून आलेने त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आणून त्यांना विश्वासात घेऊन घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करून चोरी केलेल्या सेंट्रींग प्लेटा पैकी 7,000/- रूकीच्या 07 प्लेटा काढून दिल्याने तसेच गुन्ह्यात वापरलेली 50,000/- रू कि ची मोटर सायकल असा एकून 57,000/- रू किचा मुद्देमाल पंचासमक्ष पोलिसांनी जप्त केला आहे.त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1)केशव उर्फ कान्या ताज्या भोसले वय 21 वर्ष रा.चर्चेचे मागे,डेअरी फार्म,केकती शिवार,ता.जि.अहमदनगर 2) रोहीदास उर्फ रायतास भरदार काळे वय 35 वर्षरा.जातेगाव शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे.असे असल्याचे सांगीतले त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पुढील तपास पोना/संतोष आडसूळ हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशात खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी/शिशिरकुमार देशमुख, सफो/रमेश वराट,पोहेकॉ/ बिभीषन दिवटे,पोना/भानूदास खेडकर,पोना/ राहुल द्वारके,पोकों/आव्हाड,चापोकां/अरुण मोरे यांनी केली आहे.