तिरट जुगार खेळणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीसांचा छापा
नगर प्रतिनिधी (दि.1.डिसेंबर):-भिंगार येथे तिरट जुगार खेळणाऱ्यां विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी आज रोजी कारवाई करून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि नगर पाथर्डी रोडवरील घासगल्ली कडे जाणारे रोडचे शेजारील बंद दुकानाचे आडोशाला काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनी/देशमुख यांनी पोहेकाँ/215 विलास गारूडकर,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोना/2178 राहुल द्वारके,पोना/1072 राहुल गोरे,पोना/1407भानूदास खेडकर,पोकाँ/810 अमोल आव्हाड,चापोकाँ/841अरूण मोरे अशांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणे कामी आदेश दिल्याने
पोलीस पथकाने व पंच अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 1)सुभाष
हरीचंद कोरी वय 59 वर्षे धंदा नोकरी रा.गजराज नगर,नगर औरंगाबाद रोड ता.जि.अहमदनगर 2)राजु उमाजी भिंगारदिवे वय 51 वर्षे धंदा मजुरी रा.भिम नगर, भिंगार ता.जि.अहमदनगर 3)लतीफ शेख दाऊद वय 60 वर्षे धंदा काही नाही रा.मोमीन गल्ली, भिंगार ता.जि.अहमदनगर 4)अशोक विठ्ठल त्रिंबके वय 70 वर्षे रा.खळेवाडी भिंगार ता.जि.अहमदनगर असे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून रोख रक्कम,मोबाईल, मोपेड गाडी,रिअर रिक्षा अशा प्रकारचा एकून 1,19,245 रू किंचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना/2178 राहुल द्वारके हे करीत आहेत.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे.