Maharashtra247

नगर विकास यात्रेच्या माध्यमातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रचार फेरी संपन्न;मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो-आ.संग्राम जगताप

 

अहिल्यानगर (दि.३ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यापासून नगर शहरात प्रचार सुरु केला आहे.

प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहचत आहे.सर्व भागांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ही निवडणूक नगरकरांची निवडणूक आहे,त्यामुळे प्रत्येक मतदार स्वतःची निवडणूक समजून झोकून देवून प्रचारात सहभागी होत आहे.मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.

विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये नगर विकास यात्रेच्या माध्यमातून प्रचार फेरी काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

आमदार संग्राम जगताप हे नगर विकास यात्रेच्या माध्यमातून शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी ठिकठिकाण फटाक्याची आतिषबाजी करत तसेच जेसीबीतून फुलांची उधळण करत आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page