नगर शहर मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात
अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):-शहर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार माजी महापौर भगवान फुलसौंदर,माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे,काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
तसेच अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर सुर्वणा कोतकर यांनीही माघार घेतल्याचे समजतेय.आता महायुतीचे आमदार संग्राम जगताप आणि महाविकास आघाडीचे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अपक्ष उमेदवार शशिकांत गाडे यांच्यात व इतर उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार असून २४ पैकी १० जणांनी माघार घेतल्याने एकूण १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.