मुकुंदनगरकरांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामांचे स्वागत;मुकुंदनगर उपनगराची विकासकामातून ओळख सचिन जगताप
नगर प्रतिनिधी:-मुकुंदनगर उपनगराच्या विकास कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे रस्ते, लाईट, ड्रेनेज, आदी प्रश्न मार्गी लावले आहेत. याचबरोबर मुकुंदनगरमध्ये पाणी दहा ते पंधरा दिवसाला पाणी सुटत होते. त्यामुळे नागरिकांची हाल होत होते.
आमदार संग्राम जगताप यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या त्यामुळे आज मुकुंदनगरला दोन दिवसांनी पाणी मिळत आहे. याचबरोबर दर्गा दायरा परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी शासनाकडून मोठ्या निधी मंजूर करून आणला. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्द करून दिला. या माध्यमातून मुकुंदनगर उपनगराची विकास कामातून ओळख निर्माण झाली आहे. विकासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिले असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या परिसरामध्ये वास्तव्यास येत आहे. त्यामुळे मुकुंदनगरच्या विस्तारीकरणाला वेग आला असल्याचे प्रतिपादन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप समवेत समद खान, अमोल गाडे, संजय गाडे, जय दिघे, खान बाबा,सादिक जागीरदार, तौसीफ बागवान, शादाब खान (जी.के),शहबाज सय्यद, धनंजय गाडे, खान सर, नसीम शेख आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर उपनगरामध्ये प्रचार रॅली काढत नागरिकांची संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. व आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंदनगर परिसरामध्ये केलेल्या कामाची माहिती दिली.*