Maharashtra247

आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी स्व.दिलीप गांधी यांचे कुटुंबीय उतरले मैदानात

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-नगर शहर विधानसभा मतदार संघात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. 

आज रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी स्व.खा.दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.या निवडणुकीत आ.जगतापांच्या प्रचारासह सर्वच प्रक्रियेत गांधी कुटुंबीय सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.त्यामुळे आता संग्राम जगताप यांची ताकद प्रचंड वाढली आहे.

यावेळी,स्व.खा.दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी,भाजप नेते सुवेंद्र गांधी,दीप्तीताई गांधी,देवेंद्र गांधी, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले,राष्ट्रवादी समन्वयक सुमित कुलकर्णी,अमित गटने,करण भाळगट,सुमित देवतरसे,नाना जवरे, पवन गांधी तसेच आधी पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीस नगर शहर मतदार संघामध्ये संग्राम जगताप हे महायुतीचे उमेदवार आहेत.आता त्यांच्या प्रचारासह सर्वच निवडणूक प्रक्रियेत गांधी कुटुंब सक्रिय सहभाग नोंदविणार आहे.आज रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी स्व.खा.दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. निवडणुकीत गांधी कुटुंब एक निष्ठेने जगतापांना साथ देईल असं गांधी कुटुंबीयांनी स्पष्ट केलं.नगरच्या राजकारणात गांधी परिवाराचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात गांधी-जगताप हे राजकीय कुटुंबीय एकत्र आल्याने ही एक मोठी घडामोड मानली जात आहे. 

संग्राम जगताप हेच आमदार होतील-सरोज गांधी

संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे.त्यांनी मागील दहा वर्षांत नगर शहराचा मोठा विकास केला आहे.आम्ही सर्व गांधी परिवार त्यांच्यासोबत आहोत.या निवडणुकीत संग्राम जगताप हेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया स्व.खा.दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांनी दिली.

You cannot copy content of this page