Maharashtra247

गावठी कट्टा सोबत घेऊन फिरणे पडले महागात तिघे जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

अहिल्यानगर (दि.२ प्रतिनिधी):-गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई करत तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.

दि.02 नोव्हेंबर 2024 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अंमलदार भिंगार पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली, तीन इसम केंद्रीय विद्यालय, भुईकोट किल्ल्या जवळ विना नंबरच्या सुझुकी मोटारसायकलवर संशयीतरित्या थांबलेले आहेत.आता गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती अंमलदारांनी सहा.पोलीस निरक्षक जगदीश मुलगीर यांना कळवुन सपोनी.मुलगिर यांनी खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी दोन पंचासह जाऊन खात्री केली असता तीन इसम केंद्रीय विद्यालयाचे परिसरात एका विनानंबरचे चॉकलेटी रंगाची सुझकी कंपनीची बर्गमॅन मोटार सायकलवर बसुन फिरताना दिसले.

त्यावेळी त्यांना थांबण्याचा ईशारा केला असता ते न थांबता पळून जात असताना त्यांचा पेट्रोलिंग पथकातील अंमलदारांनी पाठलाग करुन त्यांचेवर झडप घालुन पकडुन त्यांचे कडील गाडीचे डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिस जाकीर शेख,अवेज फकीर मोहम्मद सव्यद,सोहेल युनुस शेख रा.सर्जेपुरा, ता.जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितल्याने सदर इसमाविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.762/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,7 भारतीय न्याय संहिता 2023 चेकलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे,चंद्रकांत माळोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे,रवि टकले,रघुनाथ कुलांगे,समीर शेख, प्रमोद लहारे,अमोल आव्हाड,वैभव झिने यांनी केली आहे.

You cannot copy content of this page