Maharashtra247

सामाजिक कार्यकर्त्या अपेक्षाताई हळदणकर यांची भारतीय जनता पार्टीच्या वसई विरार शहर जिल्हा सचिवपदी नियुक्ती

 

मुंबई प्रतिनिधी:-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्रीमती अपेक्षा हळदणकर यांची भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्हा सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर त्यांची निवड करण्यात आली असून तसे पत्र जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी त्यांना दिले आहे.यावेळी महेंद्र पाटील म्हणाले की गेली अनेक वर्षे अपेक्षाताई हळदणकर राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत आहेत तसेच वसई विरार शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम करतील अशी अपेक्षा बाळगतो.

सामाजिक कार्यकर्त्या अपेक्षा हळदणकर यांच्या निवडीने वसई विरार येथील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

You cannot copy content of this page