भीमक्रांती प्रतिष्ठानचा आधारवड हरपला..फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन
अहिल्यानगर प्रतिनिधी:-पाईपलाईन रोड येथील रहिवासी बौद्ध संस्कार संघाचे जेष्ठ उपासक भीमक्रांती प्रतिष्ठानचे आधारवड,फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते बाळासाहेब बंडू सूर्यवंशी (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने सकाळी निधन झाले.
बौद्ध संस्कार संघाचे व भीमक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्रवीणकुमार सूर्यवंशी यांचे ते वडील होत.त्यांच्या निधनाने शहरात आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.