अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-पाथर्डी शहरात सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या 2 ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीं कडून 1 लाख 79,000/-रूपये. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे सपोनि/हेमंत थोरात, अतिरीक्त कार्यभार यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,अतुल लोटके, पंकज व्यवहारे,संतोष खैरे,रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे,सागर ससाणे,जालींदर माने व महादेव भांड अशांचे पथक तयार करून पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.दि.30/ल डिसेंबर रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल अशा खादयपदार्थ सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन,पंचासमक्ष 02 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.त्यामध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनला 5 आरोपी विरूध्द 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपीचे ताब्यातुन विविध कंपनीची सुगंधीत तंबाखुच्या पिशव्या असा 1,79,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.