अहिल्यानगर (दि.१ जानेवारी):-राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दुध डेअरीची 17,00,000/-लाख रोख रक्कम लुटणारे टोळीतील विधीसंघर्षीत बालकासह 03 आरोपी ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी अनिल मुरलीधर बनसोडे (वय 51, रा.ब्राम्हणी,ता.राहुरी) हे दि.30 डिसेंबर 2024 रोजी मुळा ॲग्रो प्रोडक्ट लि.ब्राम्हणी,ता.राहुरी या कंपनीचे 17,00,000/-लाख रूपये रोख रक्कम ही बॅकेमध्ये भरणा करण्यासाठी साक्षीदारासह कारमधुन जात असताना यातील अज्ञात चार आरोपीतांनी काळया रंगाचे किया कार आडवी लावली. दोन आरोपीतांनी गज व टॉमीने फिर्यादी असलेल्या फोर्ड कारच्या काचा फोडून,साक्षीदार यांना टॉमीने मारहाण करून त्यांचे बजवळील रोख रक्कम असलेली बॅग जबरीने घेऊन गेले. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1313/2024 बीएनएस कलम 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना घटनेची प्राथमिक माहिती मिळताच नमूद गुन्हयांचा समांतर तपास करून,गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोज गोसावी,गणेश भिंगारदे,ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले,संदीप पवार,सोमनाथ झांबरे,बाळासाहेब खेडकर, रणजित जाधव,प्रमोद जाधव,अमृत आढाव, विशाल तनपुरे,किशोर शिरसाठ,रमिझ आतार, फुरकान शेख,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे, महादेव भांड,अरुण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करुन सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देवुन फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन प्राप्त करुन तसेच घटना ठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती संकलित केली.
सदर आरोपीची वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे फिर्यादीचे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी,ता.राहुरी या डेअरीमध्ये काम करणारा विधीसंघर्षीत बालक याचा गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने मुळा ॲग्रो प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे यास दिली होती.त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे,शुभम गुळसकर,अभिषेक जाधव,पप्पु कुसळकर,मोहन लष्करे यांचेसह लुटीचा कट तयार करुन मोहन लष्करे याने किया कंपनीची कार घेवुन येवुन तसेच एका मोटारसायकलवर फिर्यादीचे गाडीवर पाळत ठेवुन गाडी डेअरीमधुन निघाल्या पासुनची संपुर्ण माहिती कारमधील बसलेल्या आरोपींना दिली.
कारमधील व मोटारसायकलवरील आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवुन,गाडीच्या काचा फोडुन गाडीमधील रोख रक्कम असलेली बॅग घेवुन गेले असल्याचे सांगितले.गुन्हयातील इतर आरोपींचा स्था.गु.शा.चे वरील पथके शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आरोपी नामे सचिन राजेंद्र वायदंडे, वय 24 वर्षे, रा.गेट नं. 06, सम्राटनगर,नागापुर, एम.आय.डी.सी. ता. जि.अहिल्यानगर मुळ रा.अचानक नगर रोड, खंडाळा,ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर,शुभम मनोज गुळसकर, वय 24 वर्षे रा.बोल्हेगाव, एम.आय.डी.सी.ता. जि. अहिल्यानगर,अभिषेक लक्ष्मण जाधव,वय 24 वर्षे,रा.नवनागापुर, गजानन कॉलनी,ता. जि. अहिल्यानगर हे बोल्हेगांव, एम.आय.डी.सी. परिसरामध्ये मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करुन आरोपींकडुन गुन्ह्यातील गेले मालापैकी 3 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीची गुन्ह्याचे वेळी वापरलेली मोटारसायकल, 1200/- रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी तलवार, लोखंडी फायटर असा एकुण 4,01, 200/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीपैकी शुभम मनोज गुळसकर हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे विरुध्द यापुर्वी नारायणगांव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे.ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.