अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर होणाऱ्या गोंधळाला तसेच रात्री दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली.
या दरम्यान पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणे,सीट बेल्ट न लावणे,हेल्मेटचा वापर न करणे,विनापरवाना गाडी चालवणे आणि रस्त्यावर धिंगाणा घालणे यासारख्या नियमभंग करणाऱ्या २५० वाहनचालकांवर कारवाई केली.
या कारवाईत एकूण २ लाख ८ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.तसेच इथून पुढेही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.