अहिल्यानगर (दि.२ प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हयातील कोतवाली पोलीस स्टेशन,तोफखाना,भिंगार कॅम्प,नगर तालुका, एम.आय.डी.सी,सुपा,श्रीगोंदा,बेलवंडी, जामखेड,संगमनेर शहर, आश्वी,शिर्डी,कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील 05 वाळु तस्कर,06 दरोडा,जबरी चोरी व घरफोडी सारखे मालाविरुध्दचे गुन्हे करणारे तर 06 अग्नीशस्त्र व घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे,खंडणी मागणे,शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या व अहिल्यानगर जिल्हयातील सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण करुन सार्वजनीक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या.
त्यावर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी नमुद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी एम.पी.डी.ए.कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन संबधीत उप विभागीय पोलीस अधिकारी,यांचे व अपर पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर व श्रीरामपुर यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांना सादर केले होते.सदर श्री.राकेश ओला यांनी बारकाईने छाननी व पडताळणी करुन सदरचे प्रस्ताव शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी,अहिल्यानगर यांचे कडे सादर केले होते. त्यावरुन श्री.सिध्दाराम सालीमठ,जिल्हादंडाधिकारी,अहिल्यानगर यांनी सदर प्रस्तावांची पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी करीता खालील इसमांना स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारित करुन खालील इसमांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 01 वर्षा करीता स्थानबध्द केले आहे.
तसेच सन 2024 मध्ये संघटीतपणे टोळीने गैर कायदयाची मंडळी जमवुन अग्नीशस्त्रासह खुन करणे,खुनाचा प्रयत्न करणे,दरोडा टाकणे, दरोडा टाकरण्याचा प्रयत्न करणे, चोरी, जबरी चोरी करणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, सराकारी कामात आडथळा निर्माण करणे, अग्नीशस्त्र,घातकशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोणी येथील अमर बाळु भोसले याने त्याचे टोळीतील साथीदारांसह घातक शस्त्रासह जबरी चोरी,खुनाचा प्रयत्न, बलात्कार,घरफोडी चोरी असे गुन्हे करणारी टोळी,पारनेर येथील कुटुंबतील पुरुष व स्त्री यांना चाकुचा धाक दाखवुन दरोडा टाकणाऱ्या मिथुन उंबऱ्या काळे यांची टोळी तसेच निघोज, ता.पारनेर येथील जत्रा हॉटेलवर जेवनाचे बिलाचे कारणावरुन तलवार,लाकडी दांडके व कोयत्याने गंभीर जखमी करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सागर उर्ऱ्फ धोंडया महादु जाधव यांची टोळी व तिसगाव,ता.पाथर्डी येथील मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे घरावर दरोडा टाकुन त्यांची हत्या करणारे उमेश रोशन भोसले यांची टोळी असे एकुण 4 टोळीतील 27 सरांईत आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन 1999 चे कलमांतर्गत प्रस्ताव तयार करुन श्री. दत्तात्रय कराळे,विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांचेकडे सादर करण्यात आले असता त्यांनी वरील नमुद टोळी विरुध्द मोका कायदयान्ये कारवाई केलेली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांनी केली आहे.अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार,संघटीतपणे गुन्हे करणारे तसेच वाळु तस्करी करणा-या गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत श्री.दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री. सिध्दाराम सालीमठ, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर व श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.