अहिल्यानगर (दि.३१ प्रतिनिधी):-नववर्ष विशेष मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर यांची अवैध हातभट्टी मद्य वाहतकीवर मोठी कारवाई केली आहे.
दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र.२,श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर यांनी नववर्ष विशेष मोहिमेच्या अनषंगाने देशमुख चारी, हेलीपॅंड रोडवर,निमगाव कोराळे,ता.राहाता,जि.अहिल्यानगर येथे हातभट्टी दारू वाहतुकीवर कारवाई करत ३२० लीटर हातभट्टी गावठी दारू व एक चारचाकी वाहन असा एकूण ३लाख ८२,८००/-रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.याप्रकरणी राहुल माणिक जाधव रा.रेल्वे स्टेशन जवळ, शिंगणापुर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर हल्ली मुक्काम नांदुर बु.ता. राहाता,जि. अहिल्यानगर याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील कारवाई श्री.सागर धोमकर विभागीय उपआयुक्त रा. उ.शु.पुणे विभाग पुणे, श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक रा.उ.शु अहिल्यानगर,श्री. प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक रा.उ.शु यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनुपकुमार देशमाने, निरीक्षक,भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर,श्री. संजय हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग,दुय्यम निरीक्षक श्री.यशपाल पाटील,श्री.गोकुळ नायकोडी,श्री.रायचंद गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक,जी.जी. दुबे,जवान सर्वश्री तौसिफ शेख,प्रवीण सागर,उद्धव काळे, ओमकर पालवे,महिला जवान रत्नमाला काळापहाड तसेच जवान नि.वाहन चालक श्री.निहाल शेख यांनी सहभाग घेतला आहे.
अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती,वाहतूक, विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.