अहिल्यानगर प्रतिनिधी:- अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांना निवडश्रेणी मिळाली असून सध्या आहे त्याच ठिकाणी त्यांची नियुक्ती देण्यात आली आहे.
आगामी काळात त्यांची (DIG) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा हा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे.राकेश ओला हे 2012 तुकडी वर्षातले असून पदोन्नती झाल्यानंतर सध्यातरी पदोन्नती पदस्थापना हे अहिल्यानगरचं देण्यात आले आहे.