अहिल्यानगर (दि.३ प्रतिनिधी):-यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-37 वर्षे
▶️ *आरोपी* 1) गणेश वैजीनाथ सोनवणे,
वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर रा. साई हार्मोनी रो हाऊस नं.4, साई सिटी नगर, कोपरगाव, जि.अहिल्यानगर
2) करण नारायण जगताप, वय- 28 वर्ष, रा. यश बंगला, साई विश्व अपार्टमेंट जवळ, साई सिटी परिसर, कोपरगाव, जि.अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी-*
6,500/- रुपये.
▶️ **लाच स्विकारली*
6,500/- रुपये.
▶️ *हस्तगत रक्कम-*
6,500/- रुपये.
▶️ **लाचेची मागणी** दि.02/01/2025
▶️ *लाच स्वीकारली*
दि.02/01/2025
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दिनांक 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी सोनवणे यांच्याकडे जमा केली होती. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तलाठी गणेश सोनवणे व खाजगी इसम करण जगताप हे 6500/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार दि.02/01/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि.02/01/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान खाजगी इसम करण जगताप यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता तलाठी सोनवणे यांचे करिता 6000/-रुपये व स्वतः करिता 500/- रुपये असे एकूण 6500/- रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी केली. दि.02/01/2025 रोजी साई रेसिडेन्सी अपार्टमेंट, कोपरगाव येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून खाजगी इसम करण नारायण जगताप यांनी पंचा समक्ष 6500/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे यांनी खाजगी इसम करण नारायण जगताप यांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची रक्कम मागणी करण्यास प्रोत्साहन दिले व लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. सदर बाबत दोन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे* .
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344
▶️ *सापळा पथक* पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख
▶️ **मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आरोपी नं.1 यांचे सक्षम अधिकारी* ** *मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर**
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
=============