अहिल्यानगर (दि.३ प्रतिनिधी):-सन २०२४-२०२५ हे आर्थिक वर्ष संपण्यास अल्पसा कालावधी शिल्लक राहिलेला असल्याने मालमत्ता कर,पाणीपट्टी जास्तीत जास्त वसुली पूर्ण होणेकामी तसेच तसेच मालमत्ता कर भरणा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या दृष्टीने महानगरपालिकेची वसुलीची सर्व प्रभाग कार्यालये सर्व शासकीय सुट्ट्यांचे दिवशी,तसेच प्रत्येक शनिवारी,दुपारी २.०० (दोन) वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
तरी मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकबाकीसह संपूर्ण कराचा भरणा करावा,असे मनपाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.