अहिल्यानगर (दि.८ प्रतिनिधी):-कोन बनेगा करोडपतीमधुन बोलतोय तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे असे सांगुन ठकविणाऱ्या आरोपीस सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.दि.१.८.२०२२ रोजी फिर्यादी नारायण अरुणे (रा.वॉर्ड नंबर १७,लक्ष्मी माता मंदिर जवळ,रामवाडी, सर्जेपुरा,अहिल्यानगर) यानां दि.२०/८/२०२१ ते दि.१०/३/२०२२ पावेतो अनोळखी मोबाईल नंबर ८२९१८२२९१९, ९८६७८८२९३०, यावरुन व्हाट्सअप कॉलवरुन कॉल करुन माझा विश्वास संपादन करुन,खोटे सांगुन,मला वेगवेगळे प्रोसेसिंग फिचे नावाखाली मला त्यांचे फोन पे अकांऊट नंबर ७०२१२५९०१५ यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडुन एकुण १ लाख ३३२००/-रुपयाची फसवणुक केली आहे.
त्यावरुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलीस स्टेशन येथे गुरनं ४४/२०२२ भादंवि कलम ४१९,४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० चे कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीचा मोबाईल नंवर,बैंक अकांऊट वरुन आरोपी फैसल ईकवाल मेमन (रा.मेमन मंजिल वाली पिर रोड,कल्याण ठाणे, निअर मुंबई) येथे रहात असल्याचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाव्दारे निष्पन्न झाले आहे. आरोपीचा शोधार्थ वेळोवेळी कल्याण ठाणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळुन आला नाही तदनंतर आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी दि. ६/१/२०२५ रोजी मिळुन आल्याने त्यास या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली,आरोपीची दि. ८/१/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
नागरीकांना अहवान करण्यात येते की, कोन बनेगा करोड पती वामधून आपणास २५ लाख रुपयेची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन KYC अपडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिग अॅप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो असे वेगवेगळया आमिषाला वळी पडु नये प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर १९३० यावर तक्रार करावी.
सदरची कामगिरी श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मोरेश्वर पेंदाम, पोसई योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले,अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ,दिपाली घोडके, यांनी केली आहे.