नाशिक प्रतिनिधी (आशा मोरे/कर्डक):-गेली अनेक वर्षांपासुन चालत असलेल्या भोंगळ गलथान कारभारामुळे गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांचा सिव्हिल प्रशासनाच्या कारभारामुळे रुग्णांचे नाहक बळी जात आहे.मागील पाच ते सहा दिवसाआधी कालकथित-शीतल मोरे यांचे बंधू विकी वाकळे यांनी जयभिम ब्रिगेडचे समन्वयक मुकेश झनके यांना सिव्हील हॉस्पिटल मधील घडलेला प्रसंग कथित केला आणि तात्काळ जयभिम ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रतीक कर्डक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे ह्यांना संपर्क साधून दोषींवरती कडाक कार्यवाहीची मागणी केली.
त्या नंतर दि.६ जानेवारी रोजी चारुदत्त शिंदे यांची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन कार्यवाहीची प्रक्रिया तातडीने करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.चारुदत्त शिंदे यांनी सर्व कार्यकर्ते व पीडिताच्या नातेवाईकांच्या समक्ष कार्याध्यक्ष प्रतीक कर्डक यांना संध्याकाळी ६ वाजेच्या आदि दोषींचा अहवाल सादर करण्याचा शब्द दिला व तो यांनी जबाबदारीने पाळला.यावेळी पीडितेचे बंधू विकी वाकळे,आप्तेष्ट तसेच जयभिम ब्रिगेडचे समन्वयक अरविंद गांगुर्डे,ऍड.सुदीप निकम,अजय निकम, दिवेश आशिष मुथा, आशीर्वाद धिवरे,राज गफ्फार,अमित भोसले आदी उपस्थित होते.