अहील्यानगर (दि.२२ प्रतिनिधी):-पत्नीने प्रियकर व भावाच्या मदतीने केला अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा खुन स्थानिक गुन्हे शाखेकडून मिरजगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्हयाचा उलगडा झाला आहे.बातमीची हकिगत अशी की,दि. 10/01/2025 रोजी कर्जत तालुक्यातील रवळगाव शिवारात शेतामध्ये अज्ञात आरोपीनी एक अनोळखी इसम, वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यास गळफास देऊन, त्याचे डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करून जीवे ठार मारले होते व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने शेतामधील मुरूमाचे खदानीमध्ये प्रेत अर्धवट पुरून टाकले.याबाबत मिरजगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 10/2025 बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.घडलेल्या नाउघड खुनाच्या गुन्हयांची माहिती प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आदेशीत केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार अशांचे दोन पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.गुन्हयाचे तपासात पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देवुन,आसपासचे साक्षीदाराकडे विचारपुस करून,तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे घटना ठिकाणाचे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून, आरोपीचा शोध घेत असताना पोनि/अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व पोलीस अंमलदार विशाल कांचन यांचे मदतीने दि. 21/01/2025 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संतोष शिवाजी काळे (रा.पळसदेव,ता.इंदापूर, जि.पुणे) याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयीत आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष शिवाजी काळे (वय 44, रा.पळसदेव,ता.इंदापूर, जि.पुणे) असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्याचेमध्ये व ललिता दत्तात्रय राठोड, (रा.जमशेदपूर,ता.डिग्रस जि.यवतमाळ) हिचे अवैध प्रेमसबंध होते.त्यांचे मधील प्रेमसबंधाला तिचा पती हा विरोध करत असल्याने त्यांनी ललिता राठोड हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव, (रा.सिंगर,ता.डिग्रस, जि.यवतमाळ) अशांनी मिळून यातील मयत दत्तात्रय वामन राठोड, रा.जमशेदपूर,ता.डिग्रस, जि.यवतमाळ याचा गळा आवळून जीवे ठार मारले असल्याची माहिती सांगीतली.
पथकाने संतोष शिवाजी काळे यास अधिक विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, मागील दोन वर्षापासुन गुन्हयातील मयत दत्तात्रय वामन राठोड व त्याची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व तिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव असे ऊस तोडणीचे कामास होते. त्यातून ओळख होऊन संतोष शिवाजी काळे व ललिता दत्तात्रय राठोड यांचेत प्रेमसंबंध निर्माण झाले.याची माहिती ललिता हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव यास झाली होती.तसेच ललिता राठोड हिचा पती दत्तात्रय राठोड हा दारू पिऊन तिचेवर संशय घेऊन ललिता राठोड हिस सतत मारहाण करत होता.
दि.08/01/2025 रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यातील आरोपी संतोष शिवाजी काळे हा ललिता दत्तात्रय राठोड हिला भेटण्यासाठी गेला.त्यावेळी तिचा पती दत्तात्रय वामन राठोड तेथे आला व त्यांचेत वाद होऊन त्याने पत्नी ललिता हिस मारहाण केली.त्यावेळी संतोष शिवाजी काळे,मयताची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व प्रविण प्रल्हाद जाधव अशांनी मिळून दत्तात्रय वामन राठोड यास मारहाण करून, त्याचा गळा दोरीने आवळून त्यास जीवे ठार मारले.दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह रात्री ते राहात असलेल्या कोपीमध्ये ठेवला.दि. 09/01/2025 रोजी संतोष शिवाजी काळे याने त्याचे कडील चार चाकी वाहनाने दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह प्रविण प्रल्हाद जाधव याचेसह मिरजगाव परिसरामधील एका शेतातील खड्डयामध्ये टाकला.मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन तेथील एक दगड उचलून तोंडावर टाकला अशी माहिती सांगीतली.तसेच आरोपी ललिता राठोड व तिचा भाऊ प्रविण जाधव हे त्यांचे गावी यवतमाळ येथे गेल्याची माहिती सांगीतली.
पथकाने दि. 21/01/2025 रोजी तांत्रीक विश्लेषण व माहितीच्या आधारे प्रविण जाधव व ललिता राठोड याचा यवतमाळ येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना गुन्हयाचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे,विश्वास बेरड, हृदय घोडके,फुरकान शेख,रमिजराजा आत्तार, विशाल तनपुरे,रविंद्र घुंगासे,प्रमोद जाधव, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व भाग्यश्री भिटे यांनी केलेली आहे.