अहिल्यानगर (दि.२२ प्रतिनिधी):-जिल्हा शासकीय रुग्णालय अहील्यानगर येथे 30 वर्ष वयावरील सर्व स्त्री पुरुष रुग्णाची बी पी आणि शुगर तपासणी साठी विशेष मोहीम डॉक्टरांच्या ओपीडी वेळात कार्यान्वित करण्यात आली आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्याची देखभाल आणि काळजी घेण्याचा दृष्टीकोनातून हा राज्यात प्रथमच उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाने आणि डॉ.मनोज घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आधीसेविका लोंढे मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून राबवला जात आहे.यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि रुग्णाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी केले आहे.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.