नगर प्रतिनिधी (सागर साळवे):-स्वातंत्र्य संग्रामातील शुरवीर महायोद्धे आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास साहित्यरत्न फाउंडेशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी साहित्यरत्न फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै.अंकुश मोहिते यांच्यासह दीपक मोहिते,अनिल वाघमारे,सुनील सकट,दिपक सरोदे,पप्पू पाटिल आदिसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी अंकुश मोहिते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीतून अनेक क्रांतीकारक घडवले.त्यांची तालीम नसून क्रांतीकारक घडवण्याचे क्रांती विद्यापीठचं होते.ब्रिटीश राजवटीच्या अन्यायाविरोधात त्यांनी बंडाचे रणशिंग फुंकले.अन्याया विरुद्ध लढा देण्याची आणि संघर्ष करण्याची ऊर्जा लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून मिळते. त्यांचा इतिहास युवकांसाठी स्फुर्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.