अहिल्यानगर (दि.19 प्रतिनिधी):-शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत या टोळीकडून अहिल्यानगर, घोटी,वैजापूर येथील 4 दरोडयाचे गुन्हे उघडकीस आणून 7 आरोपीकडून 9 लाख 64,000/- रू किं.मुद्देमाल जप्त केला आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.16 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी नामे मोहित महेश पाटील (वय 25, रा.दिंडोली, ता.चौरीयासी,जि.सुरत,गुजरात) हे कारने प्रवास करत असताना अज्ञात आरोपीतांनी इर्टिगा कारने फिर्यादीस आडवून, त्यांना गन,गुप्ती व कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 40/2025 बीएनएस कलम 310 (2), 126 (2), 352, 351 आर्म ऍ़क्ट 3/25, 4/25 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल होता.जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घडलेल्या दरोडयाच्या गुन्हयांची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.आहेर यांनी पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.
पोलीस पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,नमूद गुन्हा हा विजय गणपत जाधव, (रा.श्रीरामपूर) याने त्याचे साथीदारासह केला असून ते पांढरे रंगाची इर्टिगा कारमधुन लासलगाव,जि.नाशिक येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत.पथकाने पंचाससमक्ष शिर्डी येथील कारवाडी फाटयाजवळ सापळा रचून बातमीतील वाहनास थांबवून, वाहन चालक व कारमधील इसमांना ताब्यात घेऊन,त्यांना नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नावे 1) विजय गणपत जाधव,वय 29, रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.1,श्रीरामपूर, अहिल्यानगर 2) सिध्दार्थ भाऊसाहेब कदम, वय 29, 3) राहुल संजय शिंगाडे, वय 35 4) सागर दिनकर भालेराव, वय 30 5) समीर रामदास माळी, वय 26 6) दोन विधीसंघर्षित बालक अ.क्र.2 ते 6 सर्व रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून 9,00,000/- रू किं. पांढरे रंगाची इर्टिगा कार क्रमांक एमएच-41-व्ही-2817, 45,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल, 11,000/- रू किं.त्यात दोन एअर गण, 3,000/- रू किं.3 लोखंडी कत्ती,1,000/- रू किं.एअर गण छर्रे असलेली डबी, 4,000/- रू कि.त्यात पिवळया धातुच्या अंगठया व चैन असा एकुण 9,64,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील जप्त करण्यात आलेल्या हत्याराने चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली.पथकाने आरोपीकडे आणखी कोठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपीतांनी संगमनेर तालुका, घोटी,जि.नाशिक व वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हे सांगीतलेल्या माहिती वरून दरोडा व जबरी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यातील इसमाकडे पंचासमक्ष गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयातील रोख रक्कम आपसामध्ये वाटुन घेतली असून सोन्या चांदीचे दागीने हे नाशिक येथील राजेंद्र बंधु यांना विक्री केले व त्यातुन आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटुन घेतली असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीतांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 40/2025 या गुन्हयाचे तपासकामी मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून गुन्हयाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, रमीजराजा आत्तार, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.