अहिल्यानगर (दि.19 फेब्रुवारी):-अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील बसस्टँड परिसरातील महाराजांच्या पुतळ्यास आ. संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ.संग्राम जगताप,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवरायांचे पाळणा गीत गाण्यात आले.पोलीस बँड पथकाच्या महाराष्ट्र गीत सादरीकरणानंतर पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शिवचरित्रपर देखावे, लेझीम ढोल-ताशांचा गजर, शिवरायांच्या नावाचा जयघोष यामुळे विद्यार्थ्यांची पारंपरिक मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात होते.जिल्हा मराठा विद्या प्रसारण शिक्षण मंडळातर्फे प्रति वर्षी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समाजासमोर ठेवण्याचे काम केले जाते, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करीत समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांत अधिकारी सुधीर पाटील, आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक निखिल वारे, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, विश्वासराव आठरे, प्राध्यापक सिताराम काकडे, संजीव भोर, जलअभियंता परिमल निकम सुरेश इथापे,ऍड.शिवाजीराव कराळे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लाहारे आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.