अहिल्यानगर (प्रतिनिधी):-टेम्पोमधुन येऊन रात्रीचे वेळी दुकाने फोडणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाला यश आले असून,याच आरोपींकडून नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील घरफोडीचा गुन्हयांतील 5 लाख 10,000/-हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.03 मार्च रोजी यातील फिर्यादी अकिलकुमार जाराम अक्कापेल्ली (वय 28, रा.घोडेगाव,ता.नेवासा) हे मॅनेजर असलेल्या सरकारमान्य देशी दारू दुकानाचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी दुकानातील देशी दारू घरफोडी चोरी करून चोरून नेले.याबाबत सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं.54/2025 बीएनएस कलम 331 (3), 305 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील घरफोडी गुन्हयांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.पथकाने गुन्हयाचे तपासात घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अनिल नंदु पवार,रा.शिरसगाव, (ता.श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.पथकाने बातमीदारामार्फत अनिल नंदु पवार याची माहिती घेतली असता तो व त्याचे साथीदार अशोक लेलंड कंपनीचे टेम्पो क्रमांक एमएच-12-आरएन-3432 मधुन नेवासा येथून घोडेगाव मार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ घोडेगाव फाटा येथे सापळा रचुन थांबलेले असताना संशयीत टेम्पो मिळून आल्याने त्यास थांबवून रोडचे बाजुला घेत असताना टेम्पोचे पाठीमागील बाजुस बसलेले दोन इसम उडी मारून पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील काही पोलीस अंमलदारांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व टेम्पो मधील दोन इसम असे एकुण चार इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अनिल नंदु पवार, वय 34, रा.शिरसगाव, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 2) बाळु मोहन पवार, वय 32, रा.वाळुंज, ता.अहिल्यानगर 3) संदीप बबन बर्डे, वय 37, रा.देहरे, ता.अहिल्यानगर 4) जिवन बाबासाहेब खंडागळे, वय 22, रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांची अंगझडती घेतली असता आरोपीतांचे ताब्यातुन 5,10,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 1 अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-12-आरएन-3432 व 3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपी अनिल नंदु पवार या विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार बाळु मोहन पवार, संदीप बबन बर्डे व बबलु मोहन चव्हाण, रा.कलमपूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर (फरार) व साहिल राजेश चव्हाण,रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर (फरार) यांचे सोबत दि.03 मार्च 2025 रोजी रात्री घोडेगाव, ता.नेवासा येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकान फोडून दारूचे बॉक्स ताब्यातील टेम्पोमधुन चोरून नेले.तसेच घोडेगाव येथे चोरी करण्यापुर्वी दोन-तीन दिवस अगोदर सुपा,ता.पारनेर येथील बिअर शॉपी फोडून चोरी केल्याची माहिती सांगीतली. पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अनिल नंदु पवार यांचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेला मुद्देमाल जिवन बाबासाहेब खंडागळे याचे मध्यस्थीने गौतम वाल्मीक जाधव,रा.महालगाव, ता.वैजापूर,जि.छ.संभाजीनगर व बंडू रामदास मोरे,रा.भगूर, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर अशांना विकल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार फुरकान शेख, सागर ससाणे,अमृत आढाव, सुनिल मालणकर,भगवान थोरात,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे,मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांनी केलेली आहे.