रायगड (प्रतिनिधी):- रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील मावळा संघटना शिरवणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य स्वरूपात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
सोमवार दि.१७ मार्च रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ते शिरवणे पदयात्रा करून शिवज्योतीचे आगमन झाले.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दुपारी शिवप्रेमींना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सोहळ्याला एक वेगळी रंगत आणली आणि कार्यक्रम महाराजांच्या जयघोषात पार पडला.सायंकाळी गावातुन महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.त्याला सर्व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या सोहळ्यास अखंड संघर्ष प्रतिष्ठान-ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ व मुंबई मंडळ त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.