अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मौज-मजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणारा चोरटा तोफखाना पोलिसांनी जेरबंद केला असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या १ लाख ०९,५००/- रु. किं.च्या महागड्या ३ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहे.तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसे दिवस मोटारसायकलच्या चोरीचे प्रमाण वाहत असल्याने तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपी चेक करून त्यांच्याकडे तपास करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून प्रयत्न करावा असा आदेश दिला होता.
आदेशाप्रमाणे पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील सराईत मोटार सायकल चोर विनोद उर्फ पांडया बाळकडू सरकाळे (३० वर्ष माळीवाडा ता.जि.अहिल्यानगर) हा तारकपुर ने मिस्कीन मळा रोडवर संशत्यारित्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आल्याने त्यास थांबवुन त्यास त्याच्याकडे मोटार सायकलच्या कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्याने काही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातून तीन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून खालीलप्रमाणे मोटार सायकल काढून दिल्याने त्या गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे,तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री.शैलेश पाटील, पो.हे.कॉ.अहमद इनामदार, भानुदास खेडकर,वसिमखान पठाण,सुमित गवळी यांनी केली आहे.