कल्याण (प्रतिनिधी):- अनाथ मुले महिला आणि वृद्ध यांच्या आश्रमासाठी मदत निधी उभा करण्यासाठी डॉ.रवींद्र जाधव व डॉ.सुरेखा जाधव प्रस्तुत ‘लय मजबूत भिमाचा किल्ला’ या गीताचे फेमस गायक येवले ब्रदर्स गीत सादर करून या भव्य संगीत संधीच्या म्हणजेच भीम आर्केस्ट्रा च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना संगीतमय अभिवादन अर्पण करणार आहेत.व यावेळी संविधान गौरव 2025 पुरस्कार वितरणाचा ही कार्यक्रम होणार आहे.
सदरील कार्यक्रम हा दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 4 तें 8 वाजेपर्यंत के.सी.गांधी स्कूल, ऑडोटोरियम,बैल बाजार,डी मार्ट समोर कल्याण येथे होणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच अनाथ आश्रमासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमाला हातभार लावावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी सर्वांनी ‘लय मजबूत भिमाचा किल्ला’ या कार्यक्रमाची तिकिटे घेऊन अनाथ मुले महिला आणि वृद्ध यांच्या आश्रमासाठी आपल्याकडून थोडीशी अल्पशी मदत करूया…
या कार्यक्रमाच्या तिकिटाकरिता त्वरित संपर्क साधावा वनिता कांबळे📳8850788239