महाड (दि.26 प्रतिनिधी):-प्लास्टिकची समस्या संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला सतावत आहे.प्लास्टिक बंदी आणि प्रसार भविष्यातही शक्य नाही.त्यासाठी रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील वाळसुरे गावाने पुढाकार घेऊन यावर तोडगा काढून अनेकाना प्रेरणा देईल असे कार्य करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
गावच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय समोरील रस्त्याच्या शेजारी म्हणजेच गावाच्या बाहेर 4 बाय 4 ची 4 फूट खोल जमिनीपासून एक फूट उंचीवर विटा रेती सिमेंट ची टाकी तयार करून त्यावर नाळाच्या पत्र्याचे झाकण ठेऊन म्हणजेच त्यातील रिक्त जागेतून विविध प्रकारचे प्लास्टिक जमा करता येईल तसेच गावकरी व इतर लोक गावातील जाणाऱ्या व्यक्तींना सूचित करण्यासाठी त्यावर सूचना लिहून आपल्याकडील प्लास्टिक टाकीत जमा करावे,व गावातील इतरत्र पडलेले विविध प्रकारचे प्लास्टिक टाकीमध्ये जमा करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करून टाकीत प्लास्टिक जमा करावे नंतर जमा झालेल्या प्लास्टिक हप्त्यातून एकदा दहन करावे,दहन केलेल्या प्लास्टिकचा धूर वरील पत्र्याच्या झाकणाच्या गॅप मधून बाहेर जाईल,थोडे वायू प्रदूषण होईल परंतु गाव प्लॅस्टिकमुक्त होण्यास मोठा हातभार लागेल.कारण प्लास्टिक शेतात व इतरत्र पसरल्यास जमीन नापीक होते.
पाण्यात मिळाल्यास मनुष्यप्राणी तसेच इतर पशू पक्षी व वनस्पती ह्यांचे त्यांचे आरोग्य धोक्यात येईल हे सर्व टाळण्यासाठी व स्वच्छ गाव व सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी याचा चांगला फायदा होईल आपले गाव देशात एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी नेहमीच गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सोमजाई माता समूह वाळसुरे यामध्ये प्रस्ताव मांडण्यात आला त्याचे सर्व सदस्यांनी कौतुक केले.व मान्यता दिली.
