अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी मधील अवैध दारू विक्रेत्यांवर 11 ठिकाणी छापे टाकून 30 हजार 285/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 व 26 एप्रिल रोजी हि कारवाई केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शाहीद शेख,गणेश धोत्रे,अरूण गांगुर्डे,हृदय घोडके, विजय ठोंबरे,आकाश काळे, भाग्यश्री भिटे,महादेव भांड यांनी केलेली आहे.