अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सिव्हील हॉस्पीटल येथे औषधोपचार घेत असताना खुनाच्या गुन्ह्यातील पलायन केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरंबद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,सोनई पोलीस स्टेशन येथील गुरनं 164/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1) या गुन्हयातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय 22, रा.सोनई, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर) यास दि. 02/05/2025 रोजी सोनई येथील जमावाकडून मारहाण झाल्याने त्यास औषधोपचारकामी जिल्हा रूग्णालय,अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते.नमूद आरोपीवर औषधोपचार चालू असताना तो पोलीसांची नजर चुकवून दि.07/05/2025 रोजी रात्रीच्या सुमारास पळून गेला.याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं 512/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 262 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी पलायन घटनेची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे,संदीप पवार, फुरकान शेख,रविंद्र घुंगासे,मयुर गायकवाड,बाळासाहेब नागरगोजे,मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेकामी पथकास रवाना केले.
पथक पळून गेलेल्या आरोपीचा गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना तो सिध्दार्थनगर येथील काटवनात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने सिध्दार्थनगर येथील सारडा कॉलेज पाठीमागील काटवनात संशयीत आरोपीचा शोध घेऊन तो मिळून आला. ताब्यातील आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर, वय 22, रा.सोनई, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर यास सोनई पोलीस स्टेशन येथे गुरनं 164/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1) या गुन्हयाचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.