अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ओडीसा राज्यातुन विक्रीसाठी आलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेने व राहता पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून जप्त करून आरोपीकडून 13.318 कि.ग्रॅ.गांजासह 10 लाख 81,360/-रू किं.मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की,काळ्या रंगाची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ईक्यु-9222 व पांढरे रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 अशा मधील चार इसमांनी दि. 07/05/2025 रोजी ओडीसा राज्यातुन गांजा विक्रीसाठी आणला असून ते आज रोजी राहता ते शिर्डी रोडने जाणार आहेत.
पथकाने मिळालेली माहिती राहता पोलीस ठाण्याचे पोनि/नितीन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी उपविभाग यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार तसेच राहाता पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार केले.पथक पंच व आवश्यक साधनासह मिळालेल्या माहितीवरून राहता ते शिर्डी जाणारे रोडवर साकुरी शिवारातील हॉटेल समाधान येथे सापळा रचुन थांबले असताना माहितीप्रमाणे काळे रंगाची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ईक्यु-9222 व पांढरे रंगाची स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 असे वाहन एका पाठोपाठ येताना दिसले.पथकाने दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला असता काळे रंगाचे इको स्पोर्ट कारवरील चालकाने वाहन रस्त्याचे कडेला पथकापासुन थोडे अंतरावर थांबविली.त्यापाठीमागील स्वीफ्ट कार चालकाने कार न थांबविता भरधाव वेगाने निघुन गेला.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार इको स्पोर्ट कारकडे जात असताना वाहनातील एक इसम पळून गेला.वाहन चालक पळून जाण्याचे तयारीत असताना पथकाने त्यास पोलीस व पंचाची ओळख सांगुन 1)अरूण मोतीलाल विश्वकर्मा, वय 45, रा.गितराम सोसायटी, दत्तमंदीर, नाशिक रोड, नाशिक यास ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची व त्याचे ताब्यातील वाहनाची तपासणी करून घटना ठिकाणावरून 15,000/- एक मोबाईल, 2,66,360/- रू किं.त्यात 13 किलो 318 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व 8,00,000/- रू किं.त्यात फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट कार क्रमांक एमएच-15-ई क्यु-9222 असा एकुण 10,81,360/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपी अरूण मोतीलाल विश्वकर्मा याचेकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा मुद्देमाल हा नशेसाठी वापरला जात असून तो त्याचा साथीदार 2) नितीन उर्फ आण्णा जाधव, रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी, ता.राहाता (फरार) तसेच पळून गेलेल्या स्वीफ्ट कारमधील 3) साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड, रा.शिर्डी पुर्ण नाव माहित नाही (फरार) व 4) स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-17-सीएक्स-4466 वरील चालक नाव माहित नाही (फरार) अशांनी मिळून ओडीसा राज्यामध्ये जाऊन तेथील 5) जयराम पुर्ण नाव माहित नाही (फरार) याचेकडून जप्त केलेला मुद्देमाल व स्वीफ्ट कारमध्ये असलेला 40 किलो गांजा खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची माहिती सांगीतली.
वर नमूद आरोपी हे अंमली पदार्थाचा मुद्देमाल खरेदी करून विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 211/2025 एनडीपीएस ऍ़क्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, संतोष खैरे,रोहित मिसाळ, बाळासाहेब खेडकर,फुरकान शेख,प्रशांत राठोड व राहाता पोलीस स्टेशनचे पोनि/नितीन चव्हाण,पोसई/सोळंखे,पोलीस अंमलदार धिरज अभंग,अनिल गवांदे,प्रभाकर शिरसाठ, एस.एन.अनारसे यांनी केली आहे.