आहील्यानगर (प्रतिनिधी):-मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन व गांजा विक्री करण्यासाठी स्वतःचे कब्जात-बाळगणाऱ्या दोन इसमाना कोतवाली पोलीसांनी छापा टाकत मुद्देमालासह जेरबंद केले आहे.हि कारवाई दि. ०९ मे २०२५ रोजी कोतवाली पोलिसांनी केली आहे.

कोतवाली पोलीस ठाणेचे पोसई.गणेश देशमुख हे हददीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,माळीवाडा परिसरातील पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा येथे राहत्या घरात दोन इसमांनी मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन व आमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी राहते घरामध्ये ठेवलेला आहे.अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब व पोलीस स्टाफ असे सदर माहितीच्या आधारे पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा येथे जावुन सदर ठिकाणी सापळा लावुन सदर राहते घराची घरझडती घेतली असता सदर घरामधील वरच्या मजल्यावरील दिवाणचे कप्यामध्ये मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन व आमली पदार्थ गांजा मिळुण आल्याने तेथे उपस्थित असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नावे शाहरुख अस्लम मनियार वय- २८ वर्षे रा.पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा,सैजल अस्लम मनियार वय २६ वर्षे रा. पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा असे सांगीतले.
असुन हे घर आमचेच आहे असे सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी मिळालेल्या निळ्या रंगाचे प्लॅस्टीक पिशवीमध्ये ३ किलो ३१० ग्रॅम वजनाचा आंबट उग्र वासाचा हिरवट रंगाचा ओलसर गाजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या एकुण ०७ बाटल्या त्यावर ३० एमजी/मीली असे लिहीलेले असा एकुन ३५,४४३.६०/-(पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये साठ पैशे) मुददेमाल विक्री करण्याचे उददेशाने राहते घरात आरोपी नामे शाहरुख अस्लम मनियार वय २८ वर्षे रा. पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा,सैजल अस्लम मनियार वय२६ वर्षे रा. पृथ्वीराज लॉजचे पाठीमागे माळीवाडा हे त्यांचे कब्जात बाळगताना मिळुन आले.याबाबत मपोहेकॉ/१४६० रोहीणी अशोक दरंदले यांचे फिर्यादीवरुन आरोपीं विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४४१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम २७८,१२५,१२३, गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५चे कलम ८ (सी), २० (बी), (ii) बी प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोसई.गणेश देशमुख हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोसई / गणेश देशमुख, पोसई / कृष्णकुमार सेदवाड, मपोहेकों रोहिनी दरंदले, पोहेकों / राजेंद्र औटी, विशाल दळवी, संदिप पितळे. पोकों/ दिपक रोहकले,तानाजी पवार, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, राम हंडाळ, सोमनाथ राउत, सुरज कदम, महेश पवार, सोमनाथ केकाण, मपोकों/पल्लवी रोहकले, प्रतीभा नागरे यांच्या पथकाने केली आहे.