अहिल्यानगर (प्रतिनिधी):-लुटमारीच्या उद्देशाने रेल्वेस्टेशन येथील लोखंडी पुलावर प्राध्यापकावर केलेल्या चाकु हल्ल्याच्या गुन्हयातील 2 आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी निखील विकास बोरकर (वय 34,रा.पुसद,ता.पुसद, जि.यवतमाळ) हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आले असताना दि.06 मे 2025 रोजी पहाटे 03.45 वा.सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले.
फिर्यादी हे रेल्वे स्टेशनरोड लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांनी फिर्यादीस आडवून खिसे तपासून पैस न मिळाल्याने फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने प्रतिकार केला.त्यावेळी आरोपीतांनी चाकुने त्यांचे हातावर, पाठीवर वार करून पळून गेले.याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं 438/2025 बीएनएस कलम 312, 126 (2), 3 (5) प्रमाणे जबरी चोरी प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रविण राजु चांदणे याने त्याचे दोन साथीदारासह केला असून ते सध्या सारडा कॉलेज मागे असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकातील पोलीस अंमलदारांनी तेथे जाऊन संशयीतांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक आरोपी पळून गेला.पथकाने मिळून आलेल्या प्रविण राजु चांदणे,राहुल राजू भोसले,दोन्ही रा.सारडा कॉलेजमागे अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या साथीदाराचे नाव विचारले असता त्यांनी गणेश विजय लोमटे, रा.प्रेमदान हाडको,अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांनी गुन्हयात वापरलेली 90,000/- रूपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आलेली आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रविण राजु चांदणे याने त्याचे वरील दोन साथीदारासोबत मोपेड गाडीवर जाऊन दि.06 मे 2025 रोजी पहाटे एका इसमास आडवून गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयांचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार अंमलदार गणेश धोत्रे,शाहीद शेख,विजय ठोंबरे, रोहित येमुल,रोहित मिसाळ, मयुर गायकवाड,सुनिल मालणकर,प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.