वसई विरार प्रतिनिधी (मनिषा जाधव):-पुणे येथे यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानची बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीमध्ये अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २८ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक व माजी कॅबिनेटमंत्री श्री सूर्यकांत (आप्पा) गवळी यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुमन गजानन देसाई यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी उपाध्यक्ष व कोकण उत्तर विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.तसें त्यांना नियुक्तीचे पत्रही देण्यात आले आहे.त्यांच्या नियुक्तीने परिसरात महिला वर्गामध्ये एक आनंदाचे वातावरण झाले आहे.