मंगरूळपीर तहसील कार्यालयातील कर्मचारी (लिपिक) अजय खिराडे यांना तात्काळ सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे नागरिकांची तहसीलदारांकडे मागणी
मंगरूळपीर (प्रतिनिधी):-नवीन सोनखास आंबेडकर नगर येथे 7 ते 8 दिवसापूर्वी जोरदार झालेल्या पावसाने नागरिकांच्या घरामध्ये खूप पाणी शिरले होते यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या यामुळे त्रस्त होऊन नागरिकांनी जांब गट ग्रामपंचायत मध्ये याबाबत तक्रार केली होती.
परंतु जांब गट ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता खिराडे व त्यांचे पती शासकीय नोकरदार तहसील कर्मचारी (लिपिक) अजय खिराडे यांनी पीडित नागरिकांचे काहीही ऐकून न घेता उलट सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोड व नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन काय करायचे करून घ्या मी तहसीलदार साहेबांचा राईट हॅन्ड आहे अशी मुजारकीची भाषा वापरली.
वास्तविक पाहता भारतीय ग्रामपंचायत कायद्यात,ग्रामपंचायत अधिनियम,१९५८ च्या काही तरतुदी आणि ‘ग्रामसभा’ या संकल्पनेच्या आधारावर महिला सरपंचांच्या पतींना ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करण्यास अप्रत्यक्षपणे मर्यादा येतात.परंतु सदरील व्यक्ती हा कोणालाही न जुमानता ग्रामपंचायत मध्ये लुडबुड करून पत्नीचे अधिकार हिरावून घेत स्वतःलाच सरपंच समजतोय यामुळे तात्काळ या व्यक्तीला शासनाने बडतर्फ करावे अशी सर्व नागरिकांच्या वतीने तहसीलदारांकडे दि. 30 जून 2025 रोजी मागणी केली असून लवकरात लवकर या व्यक्तीला बडतर्फ करण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील अशा स्वरूपाचे निवेदन मंगरूळपीर तहसीलदार यांना पद्मा मोहोड,हेमा भगत,सुषमा मनवर,नम्रता मनवर यांनी दिले आहे.