गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ नाव बदलून श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ नाव देण्यात यावे समाजाची मागणी..अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीचे आ.विठ्ठलराव लंघे यांना निवेदन..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या वतीने नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांची भेट घेण्यात आली.या प्रसंगी समितीच्या वतीने मागणी करण्यात आली की,राज्य शासनाने स्थापन केलेल्या परमपूज्य श्री गंगानाथ महाराज हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे परंतु या नावा बाबत समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे हे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे नाव देण्यात यावे.
यावेळी आमदार श्री.विठ्ठलराव पाटील यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला की सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मी लक्षवेधी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांना नामांतरण संदर्भात मागणी करणार आहे व हे नामांतर नक्कीच होईल असा त्यांनी शब्द दिला.यावेळी अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बाबाभाऊ शिंदे, नाथा बाबर,दया सावंत,पिराजी सावंत व समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.